बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३

संत परंपरेतील शिरोमणी

संत परंपरेतील शिरोमणी नरहरी महाराज
  आपल्या देशाला अनेक संताच्या विचारांचा, त्यांच्या जिवनमूल्यांचा आधार लाभला. त्यामुळे आपल्यातील प्रत्येकामध्ये जो बोलण्यातील मवाळपणा आहे तो तिथून आल्याचे समजते. त्यामुळे काहीजण अध्यात्माशी जोडले राहता आहेत. म्हणून आपण 'ज्ञानदेवे रचिला पाया... तुका झाला असे कळस' असं म्हणतोच ना ! त्याऐवजी असं म्हणायला काही हरकत नाही की, 'दिला उपदेश संतांनी, अन् अनेकजण पोहचले कळसावरी' अनेकजण जे महान व्यक्ती म्हणून प्रसिद्धस आले त्यांनी आपण संत विचारांमळे यापदी पोहचल्याचे मान्य केले.
ज्ञानदेवानंतर अनेक संत नावारूपाला आले, प्रत्येकाचे म्हणणे एकच होते पण ते सांगण्याची पद्धत वेगळी होती. मेहनत केल्याशिवाय आपल्या यश मिळणार नाही. जे हवे त्यासाठी प्रयत्न करायला हवे असे त्यांचे म्हणणे होते. त्याच संत परंपरेतील संत शिरोमणी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, ते संत म्हणजे संत नरहरी महाराज ! नरहरी महाराजांबद्दल एक विचित्र कथा आहे. ते आधी शिवभक्त होते, वडीलांप्रमाणे त्यांनाही आध्यात्माची आवड होती, नित्यनियमाने ते शिवमंदिरात जाऊन पूजाअर्चा करत असत. नरहरी महाराज यांचा जन्म पंढरपुरात झाला होता. ते तिथे राहत होते, तरी भगवान विठ्ठलबद्दल त्यांच्या मनात कुठलीही श्रद्धावगैरे नव्हती. 'त्या काळ्याच तोंड पाहणार नाही' असेच त्याचे म्हणणे होते. त्यामुळे ते कधी विठ्ठल मंदिरात गेले नाही.
त्यांचा सुर्वणकाराचा व्यवसाय होता, त्यामुळे व्यावसायामुळे त्यांना एकदा शिव मंदिरात जावे लागले. पण तेव्हा ही ते डोळ्यावर पट्टी बांधून तिथे गेले. मात्र तेव्हा त्यांना हरीहर म्हणजे भगवान शिव आणि विष्णू हे दोन्ही एकच असल्याचा दृष्टांत करून देण्यात आला. त्यांनंतर ते पराधीन चित्ताचा मी मला या सोन्याचा काय उपयोग असे म्हणत, त्यांनी परोपकाऱ्याच्या दिशेने आपला व्यवसाय केला आणि ते भगवान विठ्ठलाच्या भक्ती लिन झाले.
त्यांनी अनेक अभंग रचले, अनेक भक्तांचा गोतावळा जमविला. जणू विठ्ठल नामाची शाळाच भरविली. ज्यांमध्ये संपूर्ण जातीपातीच्या समूदायाने भाग घेतला त्यांनी अनेक प्रबोधनात्मक कीर्तने केली, त्याच बरोबर ते अवघ्या सुवर्णकार समाजाचे भूषण झाले म्हणून त्यांची सर्वांनी स्तुतीही केली. 'नामा म्हणे नरहरी सोनार झाला अलंकार देवाचा !' अशा अनेक प्रवासातून ते शेवटी मोक्षपदाला गेले आणि भगवान विठ्ठलामध्ये लिन झाले अन् आज त्याच पंढरपुरात संत नरहरी महाराजांची समाधी आहे. तसे प्रत्येक संतांनी आपला भारतीय समाज सुधारण्याच्या दिशेने पाऊल टाकले. तेव्हा त्यांनी आपली जमात कोणती असा प्रश्न कधी केला. जो-जो आला त्याला मार्गदर्शन करणे एवढच काम त्यांनी कायम ठेवले. त्यांच्या प्रचार प्रसारातून अनेकांनी आपली दिशा बदलवली. व्यवहार करतांनाही प्रत्येक व्यवहार हा आपला देव आहे असेच त्यांचे म्हणणे होते.
जे जे संत आतापर्यंत झाले, त्यांनी आपल्या आताच्या पिढीची कोणत्या प्रसंगात काय गत होईल, याचा अंदाज (भाकीत) त्यांच्या कार्यकाळात केले होते. त्याचा अनुभव आज आपल्या पदोपदी आल्या शिवाय राहत नाही. ही किती महत्वाची गोष्ट आहे ना ! आपल्या पिढीबद्दल केलेली प्रत्येक भविष्यवाणी आज खरी ठरलेली दिसते. त्यामुळे चमत्काराला नमस्कार करणारे आपल्यातलेच काही जण, ज्यांनी आधुकितेचा बुरखे घातलेले असले तरी, तेही या संताच्या विचारांना मानतात हे विशेष !

तरूणांनो, उद्योगी व्‍हा...

सध्या तरूणाईवर लक्ष ठेवून असणारी एखादी यंत्रणाच जणू आपल्‍या देशात असल्‍याचे दिसून येत आहे. कोणत्‍याही मुद्यावर बोला पण आजच्या तरूणांईच्या बेरोजगारीच्या मुद्यावर नाही. जणू मुद्दाम या प्रश्‍नावर दुर्लक्ष होत आहे. मात्र निवडणूका आल्‍या की, फक्‍त चर्चेपूरता तरूणाई विचारात घेतली जाते कारण सांगायची गरज वाटत नाही, असो.

प्रत्‍येकाने आपल्‍या उदरनिर्वाहासाठी काही न काही करावे. त्‍यात त्‍याने योग्य आणि मेहनतीचा मार्ग निवडावा अमूक करावं धमूक करावं अस सागणारे बरेचजण आहेत त्‍यांना मार्गदर्शक म्हटलं जातं पण नुसतं मागदर्शन मिळून प्रत्‍येकाला आपला स्‍वतःचा  व्यवसाय टाकता येतोच असे नाही.

त्‍यासाठी सर्वात प्रथम इच्‍छा शक्‍ती मग भांडवल आणि त्‍यानंतर मेहनत करण्याची तयारी हे सूत्र जळून आल्‍यावर कोणत्‍याही व्‍यक्‍तीला किंबहूना तरूणाईला स्‍वतःच्या पायावर उभे राहायला कोणी रोखू शकत नाही. शासनाच्या सकारात्‍मक धोरणामुळे भांडवलाचा प्रश्‍न काहीअर्थी मिटला असला, तरी त्‍यासाठीही आपण कोणता व्यवसायक करायचा त्‍याचे नियोजन कागदोपत्रासह सादर करावे लागते. मग तयारीच्या दृष्टीकोणातून माहिती मिळविणे त्‍याचा पाठपूरावा करणे भांडवल खर्चाचे नियोजन करणे आदी गोष्टी क्रमाने आल्‍याच ! 

आता तुम्‍ही म्‍हणाला हे सर्व ठिक आहे पण व्‍यवसायाभिमूख माहिती मिळवायची कशी, त्‍यासाठी कोणती संस्‍था कार्यरत आहे. आजच्या युगात व्‍यवसाय सांगेल असा कोण आहे. बरं व्यवसाय करायचं ठरवलही तरी तो केव्‍हा चालेल. तोपर्यंत काय खायचे हा प्रश्‍न उभा राहतील त्‍याच काय?

सर्वांत आधी नकारात्‍मकता दूर झाली पाहिजे. सध्या करताय त्याला जोडधंदा/व्‍यवसाय करावा जेणेकरून उपासमारीची वेळ येणार नाही व भीतीही दूर होईल. आठ ते बारा तासाची नोकरी त्‍यापेक्षा चार तासाची मेहनत घ्यायची तयारी तुम्‍हाला उद्याचा उद्योजक बनवेल यात शंकाच नाही. 

सध्या आजूबाजूला सुरू असणाऱ्या व्‍यवसायची यादी करा. मग तो व्यवसाय कुठला ही असो. तासंतास मोबाईल मध्ये डोकावत बसण्यापेक्षा त्‍यातूनच मार्ग / व्‍यवसाय शोधा. फक्‍त व्‍यवसायाची सुरूवात किंवा विचार त्‍यामधून मिळणाऱ्या उत्‍पन्नावर केंद्रीत करू नका, तर त्‍यासाठी लागणारी मेहनत आधी विचारात घ्या. कोणताही व्‍यवसाय लहान नसतो हे लक्षात घ्या.

बुधवार, १६ मे, २०१८

लक्ष्या चटका लावून...

'लक्ष्या' चटका लावून गेला
मराठी म्हणा ! हिंदी म्हणा ! अशा अनेक चित्रपटांमध्ये काही वेगळ्या व्यक्तीमत्वाचे आवलिये होऊन गेले. मुळात चित्रपट सृष्टीची सुरूवातच मराठी माणसाने केली. आणि त्यातही मराठीतले कलावंत हिंदीमध्येही आपलं अस्तित्व उमटवून गेले याबद्दल आपल्याला खूप अभिमान आहे. त्यांचे विनोदी अभियन आजही लोकांना हसवून जातात हे सांगायची गरज नाही. तशा हुन्नरी कलावंतांची यादी फार मोठी आहे. हास्य कलावंत म्हणून स्व. शाहीर दादा कोंडके यांचे नाव घेतले जात होते, मात्र त्यांच्या निधनानंतर, मराठी सिनेसृष्टी जणू ओस पडली होती तेव्हा एक कलावंत आला, तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जन्मला म्हणून त्याचे नाव लक्ष्मीकांत ठेवले असे तो स्वतः सांगत असे, पण त्याच्या येण्यानंतरचा तो काळ सिनेमा तयार करणाऱ्यांची दिवाळी करून गेला. तो आला, त्यानं पाहिलं, तो लढला आणि त्यानं जिंकून घेतल सारं... असचं म्हणावं लागेल. खरचं लक्ष्मीकांत बेर्डे हे नुसतं नाव वाचलं, ऐकलं तरी आपल्या तोंडावर हसू येणार हे गणित कसं ठरलेलं होत नाही का ? सिनेमा कोणाचा ? तर लक्ष्याचा असं म्हटलं की, प्रत्येक जण मग तो कोणी असो, आवर्जून टी.व्ही., पडद्यासमोर बसायचा! त्याचा तो वेगळा आवाज, अडखळत बोलण्याची ती वेगळी तऱ्हा, सगळ्यांना आपल्यात मिसळून घेण्याचे कसब, त्याचे एका मागून एक असे अनेक सिनेमे आले पण त्यात हास्या शिवाय कोणतेही सारखेपण नव्हते. प्रसिद्धी असूनही आपला साधेपणा टिकवण हे या आवलिया विदूषकाकडे असणारी सर्वात मोठी देणगी होती. अस म्हणायला काही हरकत नाही. त्याने कदाचित दोन तीन दशके सर्वांच्या मनामनांवर अधीराज्य गाजविले, त्यात फक्त हास्य अभिनेता म्हणून त्याला ओळख मिळाली असली तरी, काही गंभीर विषयाच्या सिनमांमध्येही त्याने कसदार अभिनय केला. स्व. दादा कोंडके यांच्यानंतर लोकांच्या मनामध्ये जागा मिळविणारा तो एकच ! आजही दोघेच हास्यसम्राट म्हणून ओळखले जातात. पण लक्ष्या सर्वांच्या गळ्यातील ताईत झाला होता, असं त्याचे वर्णन केलं तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही...! सचिन पिळगावकर - लक्ष्या, अशोक सराफ-लक्ष्या या जोडीनं आणि सचिन अशोक-लक्ष्या या तिघांच्या तिकडीन चांगलाच हास्य धुमाकूळ घातला. चांगलीच बनवाबनवी केली. विशेष म्हणजे लोकांनी त्याला या सिनेमामध्ये स्त्री भूमिकेत ही स्वीकारले, नव्हे डोक्यावर घेतले. प्रिया अरूण-लक्ष्या ही जोडी प्रत्यक्ष आयुष्यात जमली पण... दुर्देवाने ती टिकली नाही.. लक्ष्या सिनेमात एखाद्या क्षणी जर रडला तर अवघ्या सिनेमागृहातच नव्हे तर टि.व्ही. समोर बसणाऱ्या प्रेक्षकांच्याही डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नव्हते. 'लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन' ही बातमी अचानक सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली, असं कस शक्य आहे ते !, असं कस झालं !, तो तर काही आजारीही नव्हता!, असेच पहिल्यांदा बातमी ऐकणाऱ्यांचे उद्गार होते. मात्र आपला तो बहुरूपी लक्ष्या १६ डिसेंबरच्या त्या गुरूवारी हस्य सृष्टीला चांगलाच उपवास लावून गेला. कोणाचा विश्वासच बसत नव्हता अर्थात तो आजही बसत नाही, आपल्या वेगळ्या शैलीतून, अवघ्या महाराष्ट्राचा लाडका हास्यसम्राट म्हणविणारा 'लक्ष्या खरचं चटका लावून गेला' नाही का ? आजही त्याचा सिनेमा लागला की तो आपल्या समोर जिवंत होतो. त्याला वाहिलेली ही भावपूर्ण शब्द श्रद्धांजली...!
तो लक्ष्या स्मरणात राहील
धुमधडाक्यात आला होता,
सर्वांच्या मनात राहीला होता,
उरला नाही कोणी हास्यसम्राट आता,
सर्वांचा लक्ष्या पुन्हा दिसणार नाही,
दादा गेले, मेहमूद गेले, गेले जॉनी वॉकर,
मात्र तो गेल्याने ताटातली कोरडी झाली भाकर,
कोण जाणे देवा तुझ्या मनात होते काय ?
अवलिये असे तुलाही भावतात काय ? चटका लावून गेला, असच सारे म्हणाले
बहुरूपी अस्तित्व त्याचे, तो 'लक्ष्या स्मरणात राहील, दर्शन एकदा होता तो हसवून जाईल.. पुन्हा एकदा सर्वांना हसवून जाईल..


संत परंपरेतील शिरोमणी

संत परंपरेतील शिरोमणी नरहरी महाराज &nbsp आपल्या देशाला अनेक संताच्या विचारांचा, त्यांच्या जिवनमूल्यांचा आधार लाभला. त्यामुळे आपल्यातील ...