बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३

तरूणांनो, उद्योगी व्‍हा...

सध्या तरूणाईवर लक्ष ठेवून असणारी एखादी यंत्रणाच जणू आपल्‍या देशात असल्‍याचे दिसून येत आहे. कोणत्‍याही मुद्यावर बोला पण आजच्या तरूणांईच्या बेरोजगारीच्या मुद्यावर नाही. जणू मुद्दाम या प्रश्‍नावर दुर्लक्ष होत आहे. मात्र निवडणूका आल्‍या की, फक्‍त चर्चेपूरता तरूणाई विचारात घेतली जाते कारण सांगायची गरज वाटत नाही, असो.

प्रत्‍येकाने आपल्‍या उदरनिर्वाहासाठी काही न काही करावे. त्‍यात त्‍याने योग्य आणि मेहनतीचा मार्ग निवडावा अमूक करावं धमूक करावं अस सागणारे बरेचजण आहेत त्‍यांना मार्गदर्शक म्हटलं जातं पण नुसतं मागदर्शन मिळून प्रत्‍येकाला आपला स्‍वतःचा  व्यवसाय टाकता येतोच असे नाही.

त्‍यासाठी सर्वात प्रथम इच्‍छा शक्‍ती मग भांडवल आणि त्‍यानंतर मेहनत करण्याची तयारी हे सूत्र जळून आल्‍यावर कोणत्‍याही व्‍यक्‍तीला किंबहूना तरूणाईला स्‍वतःच्या पायावर उभे राहायला कोणी रोखू शकत नाही. शासनाच्या सकारात्‍मक धोरणामुळे भांडवलाचा प्रश्‍न काहीअर्थी मिटला असला, तरी त्‍यासाठीही आपण कोणता व्यवसायक करायचा त्‍याचे नियोजन कागदोपत्रासह सादर करावे लागते. मग तयारीच्या दृष्टीकोणातून माहिती मिळविणे त्‍याचा पाठपूरावा करणे भांडवल खर्चाचे नियोजन करणे आदी गोष्टी क्रमाने आल्‍याच ! 

आता तुम्‍ही म्‍हणाला हे सर्व ठिक आहे पण व्‍यवसायाभिमूख माहिती मिळवायची कशी, त्‍यासाठी कोणती संस्‍था कार्यरत आहे. आजच्या युगात व्‍यवसाय सांगेल असा कोण आहे. बरं व्यवसाय करायचं ठरवलही तरी तो केव्‍हा चालेल. तोपर्यंत काय खायचे हा प्रश्‍न उभा राहतील त्‍याच काय?

सर्वांत आधी नकारात्‍मकता दूर झाली पाहिजे. सध्या करताय त्याला जोडधंदा/व्‍यवसाय करावा जेणेकरून उपासमारीची वेळ येणार नाही व भीतीही दूर होईल. आठ ते बारा तासाची नोकरी त्‍यापेक्षा चार तासाची मेहनत घ्यायची तयारी तुम्‍हाला उद्याचा उद्योजक बनवेल यात शंकाच नाही. 

सध्या आजूबाजूला सुरू असणाऱ्या व्‍यवसायची यादी करा. मग तो व्यवसाय कुठला ही असो. तासंतास मोबाईल मध्ये डोकावत बसण्यापेक्षा त्‍यातूनच मार्ग / व्‍यवसाय शोधा. फक्‍त व्‍यवसायाची सुरूवात किंवा विचार त्‍यामधून मिळणाऱ्या उत्‍पन्नावर केंद्रीत करू नका, तर त्‍यासाठी लागणारी मेहनत आधी विचारात घ्या. कोणताही व्‍यवसाय लहान नसतो हे लक्षात घ्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

संत परंपरेतील शिरोमणी

संत परंपरेतील शिरोमणी नरहरी महाराज &nbsp आपल्या देशाला अनेक संताच्या विचारांचा, त्यांच्या जिवनमूल्यांचा आधार लाभला. त्यामुळे आपल्यातील ...